पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धेची फसवणूक केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धेची फसवणूक केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी वर्षा विलासराव रसाटे रा. कृष्णा नगर, सातारा यांना दोन अनोळखी इसमांनी कृष्णा नगर परिसरातील रस्त्यावर गाठून आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करून त्यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ लंपास केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.