सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील कूपर कॉलनी व निसर्ग कॉलनीत दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या केल्या. या दोन्ही घरफोड्यांमध्ये सुमारे 17 लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.
सातारा : सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील कूपर कॉलनी व निसर्ग कॉलनीत दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या केल्या. या दोन्ही घरफोड्यांमध्ये सुमारे 17 लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.
गौरव सुरेश शिंदे (वय 28, रा. कूपर कॉलनी, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 24 सप्टेबर रोजी घडली आहे. घरातील पती-पत्नी दोघेही कामानिमित्त परगावी होते. बंद फ्लॅट पाहून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केली. चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा व बेडरुमचे कडी कोयंडा तोडून प्रवेश केला. चोरीमध्ये सोन्याचे व डायमंड असलेले नेकलेस 150000 रुपयांचे, सोन्याचे व डायमंडचे ब्रेसलेट 65000 रुपयांचे, 75000 हजाराचे आणखी एक नेकलेस, 1 लाखाची सोन्याची बांगडी, 450000 हजाराचे सोन्याचे पेन्डंट, कानातले, चेन, वेगवेगळे ब्रेसलेट, कानातल्या रिंगा, मनगटी घड्याळ, रोख 2 लाखाची रक्कम असा एकूण 14 लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरला. तक्रारदार घरी आल्यानंतर त्यांना कडी कोयंडा तोडलेला दिसला. घरात जावून पाहणी केली असता चोरट्यांनी साहित्य अस्ताव्यस्त विखुरल्याचे दिसले. शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन गुन्हा दाखल केला.
दुसर्या घरफोडी प्रकरणी बळीराम बाबा सोनटक्के (वय 52, रा. समृध्दी कॉलनी, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 23 ते 24 सप्टेबर या कालावधीत घरफोडी झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातून चोरट्यांनी सोन्याचे गंठण, कानातील डायमंड सेट, मनगटी घड्याळ, चांदीचे दागिने, रोख 10 हजार रुपये असा एकूण 2 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाला आहे. दरम्यान, भरवस्तीमधील झालेल्या या चोरींच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.