गणेशोत्सव काळात तडीपारीचे आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करुन सातार्यात बिनधोकपणे फिरणार्यांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : गणेशोत्सव काळात तडीपारीचे आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करुन सातार्यात बिनधोकपणे फिरणार्यांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमित अर्जुन चव्हाण (वय 23, रा. महागाव ता.सातारा), संतोष गुलाब चव्हाण (वय 23, रा. महागाव), रविराज पृथ्वीराज चव्हाण (रा.महागाव), आशिष अर्जुन चव्हाण (रा.महागाव) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस गस्त घालत असताना संशयित तडीपारीत असतानाही फिरत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.