ट्रॅक्टर अपघातात 12 जण जखमी झाले असून चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : ट्रॅक्टर अपघातात 12 जण जखमी झाले असून चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी दोन वाजण्याच्या सुमारास दीपक उत्तम घोरपडे रा. जोतिबाची वाडी, वेळे, सातारा हे 15 ते 20 जणांबरोबर ज्योतिर्लिंग मित्र मंडळाची गणेश मूर्ती विसर्जन करून जय संभाजी अहिरे रा. अहिरेवाडी, पोस्ट वेळे, ता. सातारा यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून परतत असताना अहिरे याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर धोकादायक पद्धतीने चालवून पलटी केला. या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने करीत आहेत.