सातारा शहरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा : सातारा शहरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 ते 24 दरम्यान विनीत विजय पाटील राहणार मयुरेश्वर कॉलनी करंजीतर्फ सातारा यांची राहत्या घराच्या गेटच्या आत लावलेली 25 हजार रुपये किंमतीची पल्सर कंपनीची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास एएसआय माने करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, अफजल मस्जिद सय्यद रा. रामाचा गोट, सातारा यांची एक्टिवा दुचाकी क्र. एमएच 11 बीसी 2577 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.