सातारा जिल्हा मत्सविभागात ओळख झाल्यानंतर एकाने फिशरी (मत्सव्यवसाय) व्यवसायासाठी शासनाचे 100 टक्के अनुदान मिळवून देतो, असे सांगून तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली.
सातारा : सातारा जिल्हा मत्सविभागात ओळख झाल्यानंतर एकाने फिशरी (मत्सव्यवसाय) व्यवसायासाठी शासनाचे 100 टक्के अनुदान मिळवून देतो, असे सांगून तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दाजी पाटील, सौ.रुपाली पाटील, मंगेश पाटील या तिघांविरुध्द अशा अनिल मोरे (वय 43, रा. महागाव ता.सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 10 एप्रिल 2023 ते 1 एप्रिल 2024 या कालावधीत घडली आहे. तक्रारदार मोरे यांच्या मुलीचे फिशरी बाबतचे शिक्षण झालेले आहे. त्या शिक्षणाबाबतचे सर्टिफिकेट आणण्यासाठी मुलगी गेली असता तेथे दाजी पाटील याच्यासोबत ओळख झाली. पाटील याने ओळख वाढवत फिशरीमध्ये खूप करिअर असल्याचे सांगगितले. तसेच सांगली येथे ते प्रोजेक्ट राबवत असल्याचे लॅपटॉपवरही दाखवले. सातार्यात तुम्ही असा प्रोजेक्ट करणार असाल तर शासनाची 100 टक्के सबसिडी मिळवून देतो, असे सांगून संशयित तिघांनी तक्रारदार मोरे यांच्या मुलीचा विश्वास संपादन केला आणि फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.