दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पुणे-सातारा रस्त्यावर दत्तात्रय कृष्णा शेलार रा. भिवडी, जांब, ता. वाई, जि. सातारा यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात चालवली असताना त्यांचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातात उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.