अकरा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे, तर दोन संशयित अल्पवयीन आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
सातारा : अकरा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे, तर दोन संशयित अल्पवयीन आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. ही घटना कराड नजीकच्या उपनगरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओम संजय डुबल (वय 19) व प्रसाद महेश कुलकर्णी (19) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पीडित मुलाच्या नातेवाइक महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगा 8 सप्टेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास परिसरातील एका मंडळाजवळ खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी प्रसाद कुलकर्णी, ओम डुबल यांच्यासह अन्य दोन अल्पवयीन मुलांनी त्याला नजीकच्या हॉलमध्ये नेले. त्या ठिकाणी त्यांनी त्याला मोबाइलवर अश्लील चित्रफिती दाखविल्या. तसेच त्याचे लैंगिक शोषण केले. या कृत्याचे त्यांनी मोबाईलवर व्हिडीओ चित्रीकरणही केले. कुटुंबीयांनी याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.