‘बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये बलशाली भारताच्या निर्मितीसाठी संविधानाने नागरिकांना दिलेला सर्वात महत्वाचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भारताच्या समृद्ध लोकशाही परंपरांचा पाईक होऊन कोणत्याही प्रलोभनांनी विचलित न होता निर्भयपणे व निष्पक्षतेने मतदान करून शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेची प्रतिष्ठा जपण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.
सातारा : ‘बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये बलशाली भारताच्या निर्मितीसाठी संविधानाने नागरिकांना दिलेला सर्वात महत्वाचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भारताच्या समृद्ध लोकशाही परंपरांचा पाईक होऊन कोणत्याही प्रलोभनांनी विचलित न होता निर्भयपणे व निष्पक्षतेने मतदान करून शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेची प्रतिष्ठा जपण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. सातारा जिल्ह्याची उच्चांकी मतदान करण्याची परंपरा यावेळेसही कायम ठेवण्यासाठी मतदार म्हणून मतदानाचा हक्क वापरण्याची ई- मतदार प्रतिज्ञा केलेली आहे. त्याबद्दल हे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात येत आहे.’ असे प्रमाणपत्र ई मतदार प्रतिज्ञा घेणाऱ्या सर्व मतदारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत ऑनलाईन वितरित करण्यात येत आहे. याची माहिती निवडणूक शाखेच्या वतीने देण्यात आली आहे .
जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे जिल्हाधिकारी, सातारा जितेंद्र डुडी साहेब यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत ई-मतदार प्रतिज्ञा प्रमाणपत्र वितरण केले. सर्व मतदारांनी अशी ई प्रतिज्ञा घ्यावी व 20 नोव्हेंबर रोजी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले. सदर ई-मतदार प्रतिज्ञा प्रमाणपत्रावर क्यु आर कोड देण्यात आलेले आहेत. सदर क्यु आर कोड स्कॅन करून मतदारांना मतदार यादीतील आपले नांव व मतदान केंद्राची माहिती मिळणार आहे. त्यामुळे मतदानादिवशी मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही हे महत्वाचे आहे.
जिल्हाधिकारी, सातारा यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणेसाठी सोबत लिंक वर क्लीक करावे
ई - मतदार प्रतिज्ञा पोर्टल (सातारा जिल्हा)
Registration Link : www.evoterpledgesatara.com