अवैधरीत्या दारू विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : अवैधरीत्या दारू विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी रामनगर, ता. सातारा येथील श्रीराम मंगल कार्यालयाच्या पाठीमागे आडोशास रतन रामचंद्र जाधव रा. नवनाथ नगर, ता. सातारा हे अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून पंधराशे पाच रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.