जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता सुमारास दत्तात्रय बाबुराव वाघमारे रा. कण्हेर, ता. सातारा हे सातारा शहरातील तामजाई नगर, महानुभाव मठाच्या समोर असलेल्या टपरीच्या आडोशास जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 1360 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.