अत्याचारासह साडेतेरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अत्याचारासह साडेतेरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मार्च 2023 ते 13 जून 2024 दरम्यान सातारा शहरात राहणाऱ्या एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तसेच तिच्या मुलाचा सांभाळ करतो, असे सांगून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आले. तसेच तिच्याकडून सुमारे साडेतेरा लाख रुपये घेऊन संबंधित महिलेसह मुलाला मारून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी संदीप तानाजी लोखंडे, कुमार आवळे, भारती तानाजी लोखंडे सर्व रा. तळंदगे, ता. कागल, जि. कोल्हापूर यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर करीत आहेत.