विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 4 एप्रिल 2021 ते 18 सप्टेंबर 2024 दरम्यान वेळोवेळी गीतांजली रोहित भोईटे सध्या राहणार लिंब तालुका सातारा यांचा शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी पती रोहित हनुमंतराव भोईटे सासरे हनुमंतराव गणपत भोईटे सासू संगीता हनुमंतराव भोईटे दीर तानाजी हनुमंतराव भोईटे जाऊ प्रियंका तानाजी भोईटे सर्व रा. हाजी मलंग रोड कल्याण पूर्व यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.