अल्पवयीन युवतीवर वारंवार अत्याचार करून तिला लग्नाचे अमिष दाखवल्या प्रकरणी करंजे तालुका सातारा येथील प्रेम किरण साळुंखे वय21 राहणार कुंभारवाडा महालक्ष्मी मंदिर शेजारी करंजे पेठ सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : अल्पवयीन युवतीवर वारंवार अत्याचार करून तिला लग्नाचे अमिष दाखवल्या प्रकरणी करंजे तालुका सातारा येथील प्रेम किरण साळुंखे वय21 राहणार कुंभारवाडा महालक्ष्मी मंदिर शेजारी करंजे पेठ सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
प्राप्त फिर्यादीनुसार, अल्पवयीन युवती ही सातारा शहर परिसरातील एका महाविद्यालयात शिकायला आहे. प्रेम साळुंखे याने या युवतीला मला तू आवडतेस, असे म्हणून तिला कॉलेजमधून घेऊन गेला आणि वाढे फाटा परिसरातील एका लॉजवर तिच्यावर अत्याचार केला. यापूर्वीही त्याने संबंधित युवतीला वारंवार छेडले असता तिने नकार दिला होता. त्यावेळी प्रेम साळुंखे याने त्या युवतीच्या कुटुंबीयांच्या घरी दारू पिऊन गोंधळ घातला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल एस. के. वाघ करत आहेत.