शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताला त्रास होऊ लागल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी काल दाखल करण्यात आले होते.
कराड परिसरात मंगळवारी विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस झाला. शहरात दत्त चौकात मोठ्या होर्डिंगचा काही भाग कोसळला.
येथील विकासकास बांधकाम परवानगीसाठी दहा लाखाची लाच मागणार्या कराड पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकार्यांसह चौघांवर सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल केला असून, सहा. नगर रचनाकारासह दोनजणांना ताब्यात घेतले आहे.
रंगाची वॉलपुट्टीचे साहित्य घेऊन निघालेल्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक येथील भेदा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवर आदळला.
यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात चाचणी घेत असताना ईएसपी बॉयलरचा स्फोट झाला. आज, गुरूवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा 78 वा वाढदिवस आज 17 मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे.
सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती विचारात घेऊन मला रयत संघटनेच्या भविष्यासाठी निर्णय घेणे गरजेचे होते.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात सत्तेचे केंद्रीकरण झाल्याचे दिसत आहे. खरंतर कारखान्यात सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे होती, पण ती मिळालेली दिसत नाही.
ज्या देशात महिलांचा अर्थव्यवस्थेत वाटा राहील त्याचवेळी तो देश आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील. यासाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात केले.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या मोहिते नावाच्या महिलेचा सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याची संबंध जोडणाऱ्या एका युट्यूब चॅनेलसह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज व तळबीड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.