शहरातील कार्वे नाक्यावरील पाण्याच्या टाकीपासून ईदगाह मैदानाकडे जाणाऱ्या अंतर्गत गोळेश्वर पाणंद हा रस्ता झोपडपट्टीच्या अतिक्रमणामुळे गुदमरत आहे.
गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कराड-चिपळूण महामार्गावरील वाहतूक सोमवारी दुपारी पूर्णपणे ठप्प झाली.
आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर सर्व गोष्टी घातलेल्या आहेत. आमचा भाजप प्रवेश सुरत, गुवाहाटी मार्गे झालेला नाही.
बेईमानीची व्याख्या उद्धव ठाकरे गटाला शिकवावी लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बेईमानी उद्धव ठाकरे यांनी केली. खासदार संजय राऊत हे त्याचे मूळ आहेत.
ओगलेवाडी (ता. कराड) परिसरात पिस्तूल घेऊन फिरणार्या तिघा संशयितांना पकडण्यात सातारा गुन्हे अन्वेषण विभागास यश आले आहे.
किरपे येथील सरपंच प्रज्ञा देवकर, उपसरपंच विजय देवकर व सदस्य नरेंद्र कांबळे यांनी सरकारी जागेत अतिक्रमण करून घरे बांधल्याची तक्रार गावातीलच सामाजिक कार्यकर्ते उत्तम लोहार यांनी केली होती.
चाफळ (ता. पाटण) येथील चाफळहून पाटणकडे जाणार्या मार्गावर महाबळवाडी शेजारील घाटात गुजरवाडीनजीक दुचाकी व चारचाकी वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला.
कंटेनर ट्रकमध्ये नियमापेक्षा अधिक जनावरे भरून कत्तलीसाठी निघालेल्या कंटेनरला कोल्हापूर नाका येथे अडवून ताब्यात घेण्यात आले.
सुमारे आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने हातगाडा चालकांसह भाजीपाला विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडवली.
वाहतूक पोलिसांशी वाहनधारकांचा वाद होण्याच्या घटना वारंवार घडतात. घटनेनंतर पोलिस त्यांची बाजू मांडतात. तर वाहनधारक पोलिसांनीच आरेरावी केल्याचे सांगतात.