कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील बेघरवस्तीलगत आमराई शिवारात तरसाने हल्ला करून तब्बल 25 शेळ्या ठार केल्या आहेत.
आतापर्यंत बिबट्याचं अस्तित्व आहे का नाही, याबाबत ग्रामस्थांच्यात शंका होती. तर्कवितर्क लढवले जात होते. गुरुवारी कांबीरवाडीत बिबट्याने शेळी चारावयास गेलेल्या महिलेच्या देखतच शेळीवर हल्ला केला.
राज्यात नवीन उद्योगधंदे यायला इच्छुक असून, त्या उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्धीसाठी राज्यात स्वतंत्रपणे मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग सुरू करण्याची आवश्यकता आहे.
उसाच्या शेतात आढळून आलेल्या बिबट्यांच्या पिलांना त्यांच्या आईने अवघ्या काही तासांत स्वगृही परत नेले.
हामार्गाचे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पडलेल्या वाळूवरून घसरून मोटार रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. त्यात कारचालकासह महिला किरकोळ जखमी झाली.
कराड-ढेबेवाडी मार्गावरील विंग (ता. कराड) गावच्या हद्दीत कणसे मळा परिसरातील वळणावर दुचाकीचा ताबा सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण आपघातात एक शाळकरी मुलगा जागीच ठार झाला.
भर दुपारी कुलूप उघडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास केले. माजी नगराध्यक्षा सौ. उमा हिंगमिरे यांच्या मार्केट यार्ड परिसरातील घरात काल दुपारी चोरी झाली.
गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील एका मॉलमध्ये खंडणी वसूल करण्यासाठी नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवून पसार झालेल्या पाच जणांना तळबीड पोलिसांनी तासवडे टोलनाक्यावर एका ट्रॅव्हल्समधून मुंबईकडे जात असताना अटक केली.
कटावणीच्या साह्याने शेडचे कुलूप तोडून शेडमधील एक लाख ६५ हजार रुपये किमतीच्या १६ बकऱ्या चोरीला गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास चोरट्यांनी सीसीटीव्ही फोडून मध्यरात्रीच्या सुमारास बकऱ्या चोरीला नेल्या.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात निघालेल्या मोर्चा दरम्यान केली.