राज्यातील गटसचिव कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे, यासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी विदर्भ, मराठवाड्यातील गटसचिवांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
माजी केंद्रीय मंत्री स्व.आनंदराव चव्हाण व माजी खा. स्व.प्रेमलाताई चव्हाण (काकी) या राजकारणातील आदर्श दाम्पत्य होते. दोघांचा स्मृती दिन 8 जुलै रोजी एकाच दिवशी असतो.
कराड येथील विमानतळ विस्तारीकरणाला विस्तारवाढ विरोधी कृती समितीचा विरोध कायम आहे. प्रशासनाने याबाबत कार्यवाही करताना कोणत्याही प्रकारची संयुक्त मोजणी केलेली नाही.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय युवतीचा आगाशिवनगर मलकापूर (ता. कराड) येथील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री येथील कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील ट्रक अडवून त्यांच्याशी हुज्जत घालत त्यावर दगडफेक करत दहशत माजविणाऱ्या तिघांना शहर पोलिसांच्या डीबी पथकाने काल रात्री अटक केली.
शहरातील बसस्थानकाकडून साईबाबा मंदिर ते भेदा चौक जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री नऊच्या सुमारास जुन्या वादातून एका युवकावर ब्लेडने वार करण्यात आले.
कौटुंबिक वादातून एकाने सावत्र भावाला चाकूने भोसकल्याची घटना गोळेश्वर (ता. कराड) येथील दुपटे कॉलनीत काल सायंकाळी ही घटना घडली.
कराड येथील विजय दिवस चौक परिसरातील एका किराणामालाच्या दुकानाला सोमवारी रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे २० लाखांचे नुकसान झाले.
ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकासाठीच परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी १० लाखांपर्यंत, तर परदेशी शिक्षणासाठी २० लाखांपर्यंत कर्ज प्रस्तावित केले आहे.
कराड तालुक्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराला बांधकाम खात्याकडून पूल बांधताना टाकले जाणारे भराव कारणीभूत ठरत आहेत.