लोकसभा, विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवूया. त्यासाठी पक्ष बळकटीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
कार्यकर्त्यांच्या मताचा व विचारांचा सन्मान यापूर्वीच ठेवला असता तर शिवसेना पक्षच फुटला नसता, त्यामुळे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचे पक्ष कधीच एकत्र येऊ शकत नाहीत.
विंग-वेताळवाडी, ता. कराड येथे बुधवारी दुपारी एका घरानजीक दुर्मीळ धुळनागीण जातीचा सर्प आढळून आला.
कराड औद्यागिक वसाहत व ओगलेवाडी, हजारमाची परिसरातील लघु उद्योग खंडित वीजपुरवठ्यामुळे अडचणीत आले आहेत.
पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बुधवारी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखापरीक्षक रमेश किसन बागुल यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
रिक्षा चालकावर खंडणीसाठी गुंडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शहरातील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी रिक्षा गेटजवळ घडली.
शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून शुक्रवारी डांबरीकरणाचे काम सुरू होते. हे डांबरीकरणाचे काम सुरु असताना भाजी मंडई परिसरात डांबराचा टँकर पेटल्याची घटना घडली.
कोयना नदीपात्रात बुडणार्या मुलगी आणि मुलाला वाचविताना अभिनंदन रतन झेंडे (वय 34, रा. शाहू चौक, कराड) याचा बुडून मृत्यू झाला.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पहिल्या आरोपपत्रात सोनिया-राहुल यांची नावे समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणांमुळेच पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने स्वीकारला आहे. याबाबत वेगवेगळी मतमतांतरे असली तरी शिक्षणतज्ञ, लेखक अभ्यास करून काय मत मांडतील.