छत्रपतींच्या कराड या भूमीत आल्यानंतर माझी छाती अभिमानाने सतत फुगते. असे सांगून राजस्थानचे कॉंग्रेसचे नेते व खा. सचिन पायलट म्हणाले, भाजप व महायुतीच्या सरकारमध्ये पदाची लढाई सुरू आहे. हे पाहून जनतेचा विकास काय होणार, हे तुमच्या लक्षात येईल.
कराड येथील मलकापूर - बैलबाजार रोडलगत शुक्रवारी भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा महासंघाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याबाबत पाठिंब्याचे पत्र मराठा महासंघाच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा महासंघाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याबाबत पाठिंब्याचे पत्र मराठा महासंघाच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले.
गेली ८ ते १० वर्षे राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यांनी राज्यात विकासाच्या योजना राबविण्याऐवजी राजकारण करून राज्य अस्थिर केले. भाजपने दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्य अस्थिर ठेवण्याचे काम केले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात खूप मोठी ताकद आहे. त्यांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दबदबा आहे. त्यांची ओळख सांगावी आणि आपला अभिमान वाढवावा, असे हे नेतृत्व आहे. समोरच्या उमेदवाराची पार्श्वभूमी तुम्ही जाणून आहात.
चांदा ते बांदा पृथ्वीराजबाबांना कोणी चुकीचे बोलत नाही. एवढी पुण्याई व कर्तृत्व त्यांच्याकडे आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री असताना स्वतःचे घर भरण्यासाठी काही केले नाही. दुसऱ्या बाजूला पैशाचा पाऊस पाडणारे नेतृत्व आहे. मला कराड दक्षिणच्या मातीचा कल स्पष्ट दिसत आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कॉंग्रेस व महाविकास आघाडी मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. श्री क्षेत्र देहू येथील तपोभूमीतील या समितीचे संस्थापक तुकोबाभक्त मधुसूदन पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने आ. चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देवून आपला पाठिंबा जाहीर केला.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे यशवंतराव मोहिते, विलासकाका आणि मी प्रतिनिधीत्व केले. आमच्याकडून जनतेच्या विश्वासाला पात्र राहून विकासकामे झाली.
कमळ हे दलदलीत उगवते. कराडचा भाग सखल असल्याने इथे कमळ कधीच उगवलेले नाही. आपल्या हितासाठी आपल्याला कराडची संस्कृती हलवू द्यायची नाही. हाताला साथ देवून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे सोज्वळ नेतृत्व जपा.