मुंबई-दादर येथील सायबर गुन्हे शाखेने ऑनलाइन फसवणूकप्रकरणी अटक केलेल्या दोघांनी तालुक्यातील वडगाव हवेली येथील युवतीची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या तयार करणाऱ्या तासवडे औद्योगिक वसाहतीतील कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने आज छापा टाकला. तेथून सुमारे चार टन प्लॅस्टिक जप्त केले.
वाठार, (ता. कराड) येथून गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. संबंधित मुलीचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
कराडच्या कृष्णा कालव्याच्या माध्यमातून चार तालुक्यांतील शेतीक्षेत्रासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.
'सह्याद्रि'चा सहकारी साखर कारखान्याचा मी सभासद नाही. परंतु, सहकारामध्ये मदतीचे राजकारण करायची संस्कृती असून त्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करायचा नाही, ही आमची भूमिका आहे.
कोयना बिनतारी संदेश यंत्रणा विभागात कार्यरत असणाऱ्या सत्वशीला सुहास पवार (वय ३७, रा. सातारा) या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मलकापुरात आज घडली.
रयत माऊली यांचे आयुष्य म्हणजे एक महाकाव्यच आहे. आपल्या पतीच्या शिक्षणकार्यात त्या एकरूप, समरस झाल्या. विद्यार्थ्यांच्याविषयी त्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला.
थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेने दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणात कर्जदाराने 11 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.
‘आयपीएल’चा सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने सोमवारी ही कारवाई केली.
कराड-विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला युवक आणि शिक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचविण्यात यश आले.