लहानग्या मुलीला पाण्यात टाकून मातेनेही आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : लहानग्या मुलीला पाण्यात टाकून मातेनेही आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 जुलै रोजी साडेपाच ते सव्वा सहाच्या दरम्यान पतीचे अन्य मुलीसोबत प्रेम संबंध असल्याचा मनात गैरसमज करुन तसेच अक्षीता अक्षय साळुंखे या दोन वर्षाच्या मुलीस वारंवार रडत असल्याने, रात्री उशिरापर्यंत जागी राहिल्याने झोप होत नसल्याने होणाऱ्या त्रासास कंटाळून संचिता अक्षय साळुंखे रा. राऊतवाडी, ता. सातारा हिने वडूथ- आरळे रस्त्यावरील पुलावरून कृष्णा नदीच्या पात्रात स्वतःच्या मुलीला टाकले. त्यानंतर स्वतः उडी मारून आत्महत्या केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर करीत आहेत.