सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर होण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. सातारा-जावली मतदारसंघांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विजय निश्चित मानला जात असल्याने कार्यकर्त्यांनी शुक्रवारीच सातारा शहरामधील बर्याच ठिकाणी गुलाल आपलाच, अशा आशयाचे पोस्टर शहरातील ठिकठिकाणी झळकवले आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर होण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. सातारा-जावली मतदारसंघांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विजय निश्चित मानला जात असल्याने कार्यकर्त्यांनी शुक्रवारीच सातारा शहरामधील बर्याच ठिकाणी गुलाल आपलाच, अशा आशयाचे पोस्टर शहरातील ठिकठिकाणी झळकवले आहेत. या पोस्टरची सातारा शहरात चर्चा होती.
सातारा-जावली विधानसभा मतदारसंघांमध्ये गेली 20 वर्षे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार आहेत. यंदा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पाचवी टर्म करतील. या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अमित कदम यांनी त्यांना लढत दिली. गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन्ही उमेदवारांनी सातारा, जावली तालुका आपल्या कार्यकर्त्यांसह पिंजून काढला होता. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावली आणि सातारा तालुक्यात कोठेही कार्यकर्त्यांची दुफळी निर्माण होणार नाही याची सतत काळजी घेत येथील विकास कामांचा पाया रचला. कुडाळ, सायगाव, मेढा, करहर, आंबेघर अशा बहुतांश ठिकाणी शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांची फळी जपली. सातारा शहर आणि तालुक्यातही अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना तसेच विकास सेवा सोसायटी ग्रामपंचायत या माध्यमातून शिवेंद्रसिंहराजे यांची मजबूत पकड राहिली आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात कमी 63 टक्के मतदान झाले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विजय नक्की आहे, अशी कार्यकर्त्यांची खात्रीच आहे. त्यामुळे सातार्यात आणि जावळी तालुक्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विजयाचे पोस्टर झळकले आहेत. बहुतांश पोस्टरवर आमदार शिवेंद्रसिंहराजे विजयाची खूण करताना दिसून येत आहेत. निकालाच्या आदल्या दिवशीच सातार्यात ठिकठिकाणी पोस्टर उभारण्याची लगबग सुरू होती. सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचा पहिला निकाल सकाळी नऊ वाजता येणार आहे. त्याची प्रचंड उत्सुकता आहे. मात्र शिवेंद्रसिंहराजेच विजयी होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे सांगत कार्यकर्ते बिनधास्त आहेत.