पोवई नाका येथील शू बॉक्स या दुकानाला वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अचानक आग लागली. ही घटना सायंकाळी पावणे आठच्या वेळेस घडली. आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र तेथे कर्तव्यावर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित करून पाण्याने ही आग विझवली.
सातारा : पोवई नाका येथील शू बॉक्स या दुकानाला वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अचानक आग लागली. ही घटना सायंकाळी पावणे आठच्या वेळेस घडली. आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र तेथे कर्तव्यावर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित करून पाण्याने ही आग विझवली.
दुकानाच्या दर्शनी भागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र दुकानातील पादत्राणांचा माल मात्र बचावला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी पोवई नाक्यावर शू बॉक्स नावाचे चप्पल चे दुकान आहे. या दुकानात नेहमीप्रमाणे दुकानातील कर्मचारी कामात व्यस्त असताना दुकानाच्या कोपऱ्यात सिलिंगला असणाऱ्या वातानुकूलन यंत्रणेमध्ये शॉर्टसर्किट झाले व तेथून धूर येऊ लागला. कर्मचाऱ्यांनी तातडीने तेथील वीज पुरवठा बंद केला मात्र तोपर्यंत आग पसरली होती. म्हणता म्हणता आगीने रौद्ररूप धारण केले. त्यावेळी पोवई नाका येथे सुहास पवार आणि निकम नावाचे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. त्यांनी तातडीने तेथील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून पाण्याने आग विझवली. तसेच तेथील चपलांचे आणि बुटांचे बॉक्स सुद्धा तातडीने हलवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पोवई नाक्यावर बघ्यांची गर्दी जमली होती, मात्र अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले होते. या आगीच्या घटनेमुळे दुकानाचे लाख रुपये ची नुकसान झाले आहे.