महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा पूर असा गोष्टी कधीही पाहिल्या नाहीत, अशी प्रतिक्रीया जनतेतून समोर येत आहेत. स्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा गोष्टी ऐकायला मिळतात.
पुणे : महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा पूर असा गोष्टी कधीही पाहिल्या नाहीत, अशी प्रतिक्रीया जनतेतून समोर येत आहेत. स्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा गोष्टी ऐकायला मिळतात. पण संबंध राज्य आणि देशाच्या निवडणुकीत पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात करणे हे योग्य नाही. निवडणुकीची संबंध यंत्रणाच हातात घेण हे अयोग्य आहे. असं कधीही पाहायला मिळालं नाही. ते महाराष्ट्रातही यावेळी पाहायला मिळाले. आता त्याचा परिणाम दिसू लागला आहे. लोकांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे.
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (30 नोव्हेंबर) बाबा आढाव यांची आंदोलन स्थळी भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी बाबा आढाव यांनी एकट्यानेच हे आंदोनल करणे पुरेसं नाही. जनतेनेही अशा प्रकारचा उठाव केला नाही तर संसदीय लोकशाही एक दिवस उदध्वस्त होईल, अशी भिती व्यक्त केली आहे.
बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. बाबा आढाव यांच्या या आंदोलनामुळे लोकांमध्ये एक प्रकारचा दिलासा मिळताना दिसत आहे. याचा देशासाठी कर्तव्य म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणं हे पुरेसं नाही.जनतेनेही अशा प्रकारचा उठाव केला नाही तर संसदीय लोकशाही एक दिवस उदध्वस्त होईल. अस चित्र याठिकाणी दिसत आहे.
संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नाही.
ज्यांच्या हातात देशाची सुत्रे आहेत त्यांनाच या देशांच काही पडलेल नाही. हे माहिती असतानाही संसदेत हा प्रश्न उपस्थित केला जात नाही. विरोधीपक्षाने याबाबत प्रश्न उपस्थित केला तर त्यांना बोलू दिले जात नाही. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून आमचं म्हणण.
मांडण्याची गेल्या सहा दिवसांपासून मागणी करत आहेत. पण एकदाही त्यांची मागणी मान्य झाली नाही. एवढच नाही तर एक मिनिट सुद्धा संसदेत देशातील एकाही प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही. याचा अर्थ राज्यकर्त्यांकडूनच संसदीय लोकशाही आघात करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. यासाठी आता तिथे काय चाललंय हे माध्यमांसमोर बोलून चालणार नाही. शेवटी लोकांमध्येच जावं लागेल. लोकांनाच जागृत करावं लागेल. बाबा आढाव यांनी या उठावाची सुरूवात केली आहे. माझी खात्री आहे याचा आवश्यक परिणाम होईल.
इव्हीएममध्ये घोटाळा
इव्हीएममध्ये घोटाळा असल्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत. पण काही लोकांनी आमच्याकडे येऊन ईव्हीएम तीस टक्के मत बदलता येतात याबाबत आम्हाला सांगितलं होतं. अशा पद्धतीने इव्हीएममध्ये घोटाळा करणे शक्य आहे आणि ते केलं जाऊ शकतं. पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे इव्हीएम अशा पद्धतीने टोकाची भूमिका घेईल असं आम्हाला कधीही वाटलं नाही.