सातारा जावळी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळीला वेग आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमित दादा कदम यांचे मशाल चिन्ह हाती घेऊन कार्यकर्ते जावळी खोऱ्यातील शिवारात जाऊन आपली भूमिका मांडत असल्याचे चित्र दिसत आहे.
सातारा : सातारा जावळी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळीला वेग आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमित दादा कदम यांचे मशाल चिन्ह हाती घेऊन कार्यकर्ते जावळी खोऱ्यातील शिवारात जाऊन आपली भूमिका मांडत असल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवारासाठी मतदानांचे राष्ट्रीय कर्तव्य मतदारांनी पार पाडावे याची सुध्दा आठवण केली जात आहे.
सध्या मेढा भागातील कुसुंबी, मोहाट, गांजे, करंजे, सावली, म्हाते, गोंदेमाळ, रिटकवली, बिभवी, ओझरे, निझरे, ६० ते ७० गाव वाड्यावर त्यामध्ये प्रचार करण्यासाठी शेलार मामाची भूमिका घेऊन नारायण शिंगटे गुरुजी, सुरेश पार्ट व डॉ. राजेंद्र कदम, त्यांच्यासोबत शिवसैनिक राजेंद्र सपकाळ, दीपक सपकाळ, काशिनाथ धनवडे, विजय मर्ढेकर, किसन जगताप, राम गोरे, संजय कोकरे जहांगीर पठाण, सलीम शेख आणि महाविकास आघाडीचे शिलेदार शिवारात जाऊन आपली भूमिका विशद करत आहेत.
त्यांच्या मशालीचे सर्व शेतकरी बांधव व माता-भगिनी स्वागत करत आहेत. भूमिपुत्रांसाठी आवाज उठवणाऱ्या या सामान्य कुटुंबातील मशाल हाती घेणाऱ्या जननायकाला नक्कीच यश मिळो. यासाठी गावोगावी ग्रामदैवतेची प्रार्थना माता-भगिनी करू लागलेले आहेत.