भारतातीय बहुतांश भागात थंडी वाढतच आहे. दरम्यान पुढील २ दिवसांत मध्य भारत आणि ५ दिवसांत वायव्य भारतातील प्रमुख भागात थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे.
पुणे : भारतातीय बहुतांश भागात थंडी वाढतच आहे. दरम्यान पुढील २ दिवसांत मध्य भारत आणि ५ दिवसांत वायव्य भारतातील प्रमुख भागात थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ती कमी होईल, असे भारतीय हवामान विभागाने आज (दि.१६) दिलेल्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे.
...तर तामिळनाडूत अतिमुसळधार
भारतीय हवामान विभागाने पुढे म्हटले आहे की, "दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याच्या प्रभावामुळे १७ आणि १८ डिसेंबर रोजी तामिळनाडूमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे". तसेच आंध्र प्रदेश आणि रायलसीमा किनारी भागात १७ ते १९ डिसेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १७ ते २० डिसेंबर दरम्यान तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश किनारी आणि रायलसीमा येथे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मागील २४ तासांतील तापमानाच्या नोंदी
मागील २४ तासात जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या बहुतेक भागात ०° सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदवले गेले आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात ०-६° सेल्सिअस तर वायव्य, पूर्व, मध्य आणि पश्चिम भारतातील उर्वरित भागात ६-१२° सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला थंडीच्या लाटेचा इशारा?
१६ डिसेंबर रोजी पश्चिम मध्य प्रदेशातील काही ठिकाणी, १६ ते २० डिसेंबर दरम्यान हिमाचल प्रदेशात, १६ ते २२ डिसेंबर दरम्यान जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद आणि पूर्व राजस्थानात थंडीच्या लाटेपासून तीव्र थंडीच्या लाटेची शक्यता आहे. १६ ते २० डिसेंबर दरम्यान पंजाब, हरियाणा-चंदीगड, १६ ते २० डिसेंबर दरम्यान उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि तेलंगणा, १६ डिसेंबर रोजी पश्चिम राजस्थानात १६ ते २२ डिसेंबर दरम्यान, पूर्व मध्य प्रदेशात १६ आणि १७ डिसेंबर रोजी पश्चिम मध्य प्रदेशात थंडीच्या लाटेची शक्यता आहे.