स्वातंत्र्यपूर्व काळातही आरोग्य सेवेची परंपरा चालू ठेवत आज तब्बल 113 वर्षे संपूर्ण सातारा जिल्ह्यात आर्यांग्ल हे नाव आरोग्य सेवेसाठी एक मानाचा मानदंड ठरले आहे. नव्या अतिदक्षता विभागाच्या सुसज्ज आरोग्य सेवेमुळे यामध्ये अधिक भर पडणार आहे.
सातारा : स्वातंत्र्यपूर्व काळातही आरोग्य सेवेची परंपरा चालू ठेवत आज तब्बल 113 वर्षे संपूर्ण सातारा जिल्ह्यात आर्यांग्ल हे नाव आरोग्य सेवेसाठी एक मानाचा मानदंड ठरले आहे. नव्या अतिदक्षता विभागाच्या सुसज्ज आरोग्य सेवेमुळे यामध्ये अधिक भर पडणार आहे. आर्यन आणि सातारा हे एक अतूट नाते आहे, ते अधिकच वृद्धिंगत होईल असे उद्गार सातारा जावली तालुक्याचे आमदार श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
सातारा येथील आयुर्वेद प्रसारक मंडळी, सातारा. शेठ चंदनमल मुथा आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय, डॉ. मो. ना. आगाशे धर्मार्थ रुग्णालय व प्रसूतिगृह आर्यांग्ल हॉस्पिटल, सातारा अतिदक्षता विभाग (आय.सी.यू.) या सातारकरांना आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण व निष्णात डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली माफक दरात वैद्यकीय सेवा देण्यासाठी जानकीबाई, प्रेमसुख झंवर, / प्रेमलता, मुरलीधर झंवर यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या सुसज्ज नूतन सीयू कक्षाचे उद्घाटन प्रसंगी आमदार भोसले यांनी वरील उद्गार काढले.
या कार्यक्रमासाठी हॉस्पिटलचे चेअरमन अजित मुथा, अध्यक्ष बाळकृष्ण जाजू, सचिव विनोद झंवर, सौ. मेघना बाफना, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र चोरगे तसेच या नूतन आयसीयू कक्षाचे प्रमुख संचालक डॉ.ओंकार पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
धन्वंतरी पूजन आणि दीप प्रज्वलनाने मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी धन्वंतरी स्तवन गायले. त्यानंतर आपल्या प्रास्ताविक भाषणात हॉस्पिटलचे चेअरमनअजित मुथा यांनी आजपर्यंत सातारा जिल्ह्यात आर्यांग्ल हे नाव आरोग्य सेवेचा वसा देणारे तसेच आजपर्यंत अनेकांना जन्म देणारे स्थळ बनले आहे. संस्थेच्या वतीने लवकरच पंधरा मजली सुसज्ज इमारत उभारणीचा संकल्प सोडला असून तो दोन वर्षात पूर्ण होईल. यासाठी मान्यवर व्यक्ती, संस्था यांचे सहकार्य लाभतच आहे. मात्र अद्यापही पुढे होऊन अशा दानशूर व्यक्तींनी या आरोग्य सेवेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमात झंवर परिवाराचेवतीने आर्यांग्ल हॉस्पिटलच्या या नूतन आरोग्य सेवेसाठी 51 लाख रुपयांची देणगी किशोर शेठ झंवर यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाजू यांचे कडे प्रदान करण्यात आली. यावेळी संध्या झंवर, भरत झंवर, समर झंवर, संस्थेचे सचिव विनोद शेठ झंवर, सौ. रेखा झंवर आणि राघव झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेली आरोग्य सेवा आजही यशस्वीपणे सुरू आहे या सेवेत सातारा जिल्ह्यातील सर्वांनीच तनभन तनमन आणि धना द्वारे सहभागी होऊन या कार्याचा विस्तार करावा, असे आवाहन यावेळी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र चोरगे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
याप्रसंगी अध्यक्ष बाळासाहेब जाजू यांनी, संस्थेने आपल्या आरोग्य सेवेचा हा वसा विशेष करून गोरगरीब रुग्णांसाठी सुरू ठेवला. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली ही सेवा आज मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक प्रणालीने वृद्धिंगत होत आहे. याचा विशेष आनंद वाटतो. अनेकांच्या सहकार्यातून हे कार्य मोठे होत आहे असे आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव विनोद शेठ झंवर यांनी केले. तर सूत्रसंचालन सुनील मोरे यांनी केले. या कार्यक्रमात आर्यन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.नितीन अडसूळ, डॉ.ओंकार पाटील डॉ.आदेश पाटील, डॉ.निलेश कुचेकर आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट संयोजनासाठी आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडितराव लोंढे आर्यांग्ल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.नितीन आडसूळ, पर्यवेक्षक विजय शिंदे, मंदार बोकील यांचे सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले .या उद्घाटन सोहळ्यास सातारा येथील विविध क्षेत्रातील प्रथित यश मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये श्रीराम कुलकर्णी, प्रेमामुथा ,अनुप मुथा, सौ. रिचा मुथा, विनोदशेठ राठी, चंद्रकांत शहा, कुलकर्णी, नावंधर आदींची प्रमुख उपस्थिती होती.