सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीच्या शर्वरी कृष्णा राठोड या प्रशिक्षणार्थीने गोरखपूर उत्तर प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केले. तिच्या या यशाचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.
सातारा : सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीच्या शर्वरी कृष्णा राठोड या प्रशिक्षणार्थीने गोरखपूर उत्तर प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केले. तिच्या या यशाचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे. दिनांक 16 ते 20 नोव्हेंबर या दरम्यान गोरखपुर उत्तर प्रदेश येथे शालेय राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटांतर्गत 62 किलो वजनी गटात शर्वरी राठोड हिने हे यश प्राप्त केले. प्रबोधिनीचे हे मोठे यश मानले जात आहे. प्रबोधिनीचे क्रीडा समन्वयक सुनील सपकाळ प्रबोधिनी व्यवस्थापक सॅम्युएल मोरे, सहाय्यक समन्वयक सागर भुजबळ, कुस्ती प्रशिक्षक आदित्य इंजेकर, कुस्ती प्रशिक्षक धनश्री मांडवे यांनी या विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले आहे.
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी मधील पदक प्राप्त प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी प्रशिक्षक व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.