सुनील गावस्कर यांची प्लेइंग ११ : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. यामध्ये आता पहिला सामना झाला आहे आणि दुसरा सामन्याचा शुभारंभ ६ डिसेंबरपासून होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाल्यामुळे तो पहिल्या कसोटीमध्ये अनुपस्थित होता.
मुंबई : सुनील गावस्कर यांची प्लेइंग ११ : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. यामध्ये आता पहिला सामना झाला आहे आणि दुसरा सामन्याचा शुभारंभ ६ डिसेंबरपासून होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाल्यामुळे तो पहिल्या कसोटीमध्ये अनुपस्थित होता. भारताच्या संघाचे कर्णधारपद जसप्रीत बुमराहला देण्यात आले होते. यामुळे रोहित शर्माच्या जागेवर केएल राहुलला सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरवले होते. आता दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडिया वेगळ्या ऑर्डरने उतरणार आहे कारण भारताचा कर्णधार रोहित शर्माचे संघामध्ये पुनरागमन झाले आहे.
ॲडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्ट मॅचसाठी टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले जाऊ शकतात. आता भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी त्यांची प्लेइंग ११ बद्दल सांगितले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 6 ते 10 डिसेंबर यादरम्यान ॲडलेडमध्ये सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असेल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 पासून खेळवला जाणार आहे. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. भारताला शनिवारपासून कॅनबेरा येथील मनुका ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय दिवस-रात्र सराव सामना खेळायचा आहे.
काल म्हणेजच २८ नोव्हेंबर रोजी भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट घेतली यावेळी पंतप्रधानांनी सामन्याची आणि संघाची घोषणा केली आहे. कॅनबेरामध्ये गुलाबी चेंडूने खेळला जाणारा सराव सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण ॲडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट कसोटीपूर्वी हा एकमेव सराव सामना भारताचा संघ खेळणार आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कर्णधार रोहित शर्माचा हा पहिलाच सामना असणार आहे, कारण मुलाच्या जन्मामुळे तो पर्थमध्ये पहिली कसोटी खेळू शकला नाही. सुनील गावसकर 7Cricket शी बोलताना म्हणाले, ‘मला वाटते दोन बदल नक्कीच होतील, रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघेही प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येतील.’
ॲडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्टमध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमध्ये आले तर देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेलला बाहेर बसावं लागेल. याशिवाय सर्वांच्या नजरा केएल राहुलच्या फलंदाजीवर असेल. प्लेइंग ११ बद्दल विचारल्यानंतर सुनील गावस्कर म्हणाले की, ‘मला वाटते की टीम इंडियाच्या फलंदाजी क्रमवारीत बदल होणार आहेत, यामध्ये केएल राहुलच्या जागेवर रोहित शर्मा असणार आहे, शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, पडिक्कल आणि जुरेल संघाबाहेर असतील, तर राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतील. ‘
ॲडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्टसाठी फिरकी विभागात काही बदल दिसू शकतात. भारताने शेवटच्या वेळी 2020 मध्ये ॲडलेडमध्ये दिवस-रात्र कसोटी खेळली होती, त्या सामन्यात अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात 45 धावांत 4 बळी घेतले होते. या काळात रविचंद्रन अश्विनने स्टीव्ह स्मिथलाही बाद केले होते. मात्र, सुनील गावसकर यांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. सुनील गावस्कर म्हणाले, ‘आणि आणखी एक बदल घडू शकतो तो म्हणजे वॉशिंग्टन सुंदरच्या जागी रवींद्र जडेजाला आणावे.’ कारण, गुलाबी चेंडूच्या कसोटीत फलंदाजी महत्त्वाची ठरते आणि फिरकीपटूंचा सहसा वापर केला जात नाही.