सेराटोव्ह : युक्रेनचा (Ukraine) रशियावर (Russia) ड्रोनद्वारे हल्ला (Drone Attack) करण्यात आला आहे. रशियावर करण्यात आलेला ड्रोन हल्ला साधासुधा नसून हुबेहुब अमेरिकेच्या 9/11 च्या हल्ल्यासारखाच आहे. रशियाच्या एंजेल्स हवाई तळावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. युक्रेननं रशियातील 38 मजली इमारतीत ड्रोननं हल्ला केला आहे.
आज (26 ऑगस्ट) युक्रेननं रशियातील 38 मजली उंच इमारतीवर ड्रोननं हल्ला केला. युक्रेनचे ड्रोन थेट इमारतीत घुसलं. ड्रोनच्या धडकेनं किमान 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना व्होल्गा स्काय या सेराटोव्ह शहरातील सर्वात उंच 38 मजली इमारत आहे. त्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार, एक ड्रोन उडताना दिसत आहे, ते ड्रोन थेट 38 मजली इमारतीत घुसलं आणि आग लागली. इमारतीच्या काचा फुटल्यानं खाली उभ्या असलेल्या 20 हून अधिक वाहनांचंही नुकसान झालं आहे.