अतीत (ता. सातारा) येथील हॉटेल सिमरनजितमधून साहित्य चोरी करणार्या तीन संशयितांना बोरगाव पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून साहित्य व कार असा 8 लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागठाणे : अतीत (ता. सातारा) येथील हॉटेल सिमरनजितमधून साहित्य चोरी करणार्या तीन संशयितांना बोरगाव पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून साहित्य व कार असा 8 लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शंकर जयवंत शिंदे (वय 23 रा. सोनगाव निंब, ता. सातारा), राज सतीश दणाने (वय 21 रा. वनवासवाडी), प्रज्वल वसंत जाधव (रा. कोडोली, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अतीत येथील सिमरनजित हॉटेलमध्ये फर्निचरचे काम सुरू असताना स्टीलचे काऊंटर व इतर साहित्य असा 1 लाख 68 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. पोलिस गस्त सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना हॉटेलच्या आवारात एक वाहन संशयास्पदरित्या फिरताना आढळले. पोलिसांनी या वाहनांच्या चालकास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.
मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने दोन साथीदारांसह साहित्य चोरी केल्याचे कबुल केले. सपोनि रविंद्र तेलतुंबडे याच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत चव्हाण,र अतुल कणसे, प्रवीण शिंदे, सतीश पवार, संजय जाधव यांनी ही कारवाई केली.