अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा हळदी समारंभ आज २९ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये झाला. हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेता नागा चैतन्य - शोभिता धुलिपालाच्या हळदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबई : अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा हळदी समारंभ आज २९ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये झाला. हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेता नागा चैतन्य - शोभिता धुलिपालाच्या हळदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाची सुरुवात हळदीने झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य - शोभिताचे लग्ने ४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओजमध्य झाले.
शोभिता धुलिपालावरून हटणार नाही नजर
शोभिता धूलिपाला हळदी समारंभात दोन वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये दिसले. पहिल्या लूकमध्ये तिने स्पार्कल लाल साडी नेसली होती. सोबतच तिने मांग टीका देखील घातला होता. दुसऱ्या लूकमध्ये, शोभिताने पोन्नियिन सेल्वनमध्ये साकारलेली भूमिकेचा लूक केला. आणि हळदीसाठी पिवळा रंग परिधान केला.
नागा चैतन्यचा लूकही लक्षवेधी
नागा चैतन्य हळदी समारंभाच्या दरम्यान आनंदात दिसला. त्याने कुर्ता पायजमा परिधान केला होता. हळदीचे काही व्हिडिओ उत्तम क्षणांचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. रिपोर्टनुसार, लग्नाच्या काही दिवस आधी या कपलबद्दल अफवा होत्या की, त्यांनी आपल्या लग्नाच्या चित्रपटाचे अधिकार ५० कोटींना नेटफ्लिक्सला विकले गेले. पण, नागा चैतन्यने या वृत्ताचे खंडन केले. एका बातचीतमध्ये त्याने सांगितले होते की, हे वृत्त खोटे आहे, अशा प्रकारचा कोणताही समझोता झालेला नाही.