मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार
एकास मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सातारा : एकास मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कणसे किया च्या समोर मिथुन गोरखनाथ लोंढे रा. जकातवाडी, तालुका सातारा यांना शिवीगाळ, मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी मुबारक शेख व तीन अनोळखी (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.