डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.
जेएसपीएमच्या नार्हे टेक्निकल कॅम्पस, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. (प्रा.) प्रतिभा अमृत रसाळ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी संपादन केली.
सातारा : जेएसपीएमच्या नार्हे टेक्निकल कॅम्पस, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. (प्रा.) प्रतिभा अमृत रसाळ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी संपादन केली.
‘महाराष्ट्रातील तृतीयपंथीय समुदायासाठी रोजगाराच्या संधींच्या दृष्टीने कौशल्यविकासाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर त्यांनी संशोधन केले. यासाठी त्यांना डॉ. आनंद दडस व डॉ. विकास सुरेश डोळे यांचे मार्गदर्शन लाभले. बोरखळ (ता. सातारा) येथील डॉ. रसाळ यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.