सातारा विधानसभा मतदारसंघातील निर्विवाद यशामुळे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सातार्यात श्री काळाराम मंदिर येथील श्रीरामाला अभिषेक आणि महाआरती करण्यात आली.
सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघातील निर्विवाद यशामुळे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सातार्यात श्री काळाराम मंदिर येथील श्रीरामाला अभिषेक आणि महाआरती करण्यात आली.
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे दोनशे तीस आमदार निवडून आले आहेत. त्यातही एकट्या भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार निवडून आले आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असून माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत आणि इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी, महायुतीचे आठही आमदार निवडून आल्याबद्दल त्यांचा मंत्रिमंडळात योग्य सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्या हस्ते सातार्यातील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर येथील श्रीरामाला अभिषेक आणि महाआरती करण्यात आली, कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी श्रीरामाला साकडे घालण्यात आले.
यावेळी भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, माझी नगराध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारणी सदस्य रंजनाताई रावत, नगरसेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जांभळे, नगरसेविका आणि जिल्हा उपाध्यक्ष सिद्धी ताई पवार, नगरसेविका प्राचीताई शहाणे, राहुल शिवनामे, डॉ सचिन साळुंखे, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, चंदन घोडके, सातारा ग्रामीण पश्चिम सरचिटणीस प्रदीप जाधव, सातारा जिल्हा चिटणीस कल्पना जाधव, सातारा शहर उपाध्यक्ष जयराम मोरे, विजय नायक, अमोल टंकसाळे, कायदा आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन तिरोडकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित भिसे, सातारा शहर महिला मोर्चा अध्यक्ष रीना भणगे, बेटी बचाव बेटी पढाव आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनी हुबळीकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, जैन महिला आघाडी शहर अध्यक्ष सुचारीचा कंडारकर, अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष अंजनी त्रिंबके, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भरत पवार, पुणे जिल्ह्यातील कसबा विधानसभा मतदार संघ विस्तारक अविनाश खर्शीकर, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष कोमल इंगवले, ओबीसी मोर्चा महिला शहर उपाध्यक्ष जयश्री पाटुकले, सुमित भिसे आणि पदाधिकारी उपस्थित होते.