शिर्डी येथे झालेल्या अकराव्या राष्ट्रीय स्लिंगशाॅट (गलोरी) स्पर्धेमध्ये सातारचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे यांना खुल्या गटात रौप्य पदक मिळाले.
सातारा : शिर्डी येथे झालेल्या अकराव्या राष्ट्रीय स्लिंगशाॅट (गलोरी) स्पर्धेमध्ये सातारचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे यांना खुल्या गटात रौप्य पदक मिळाले.
शिर्डी येथे दिनांक सात आणि आठ डिसेंबर दरम्यान झालेल्या अकराव्या राष्ट्रीय स्लिंगशाॅट स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात राजस्थान छत्तीसगड ओरिसा, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तरप्रदेश येथील जवळपास साडेचारशे च्या वर खेळाडू सहभागी झाले होते.
स्लिंगशाॅट असोसिएशन चे महाराष्ट्र सचिव आणि भा ज पा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यातून जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे तसेच संभाजीनगर, पालघर, नाशिक, पुणे, ठाणे, कोल्हापूर , सिंधुदुर्ग येथील विविध वयोगटातील बाहत्तर खेळाडू सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी चे अध्यक्ष नंदूआबा गोंदकर पाटील यांच्या हस्ते आणि स्लिंगशाॅट असोसिएशन ऑफ इंडिया चे राष्ट्रीय सचिव लवकुमार जाधव यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न झाले, यावेळी राजेश चव्हाण महाराष्ट्र स्लिंगशाॅट असोसिएशन अध्यक्ष , विकास गोसावी महाराष्ट्र स्लिंगशाॅट असोसिएशन सचिव , मदन बदर बँडी स्पोर्ट्स इंडिया असोसिएशन महाराष्ट्र सचिव, अंभोरे महाराष्ट्र सहसचिव स्लिंगशाॅट असोसिएशन यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्लिंगशाॅट (गलोरी), या आपल्या ऐतिहासिक आणि पारंपारिक खेळाची सातारकरांना पुन्हा नव्याने ओळख व्हावी, आणि यातील नियम समजावेत, यासाठी लवकरच सातारा शहरात एखाद्या मैदानावर या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून नागरिकांमध्ये या खेळाबद्दल पुन्हा ओढ निर्माण व्हावी, यासाठी सर्वांना खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर पुढच्या वर्षीची राष्ट्रीय आणि एखादी आंतरराष्ट्रीय स्लिंगशाॅट स्पर्धा साताऱ्यात व्हावी यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती यावेळी विकास गोसावी यांनी दिली.