बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणार्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण हलक्यात घेऊ नका, असे खडेबोल सीआयडीला सुनावले.
मुंबई : बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणार्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण हलक्यात घेऊ नका, असे खडेबोल सीआयडीला सुनावले.
या प्रकरणाचा तपास सीआयडी गांभीर्याने करीत नसल्याचे दिसत आहे. तपास यंत्रणेची भूमिका संशयास्पद आहे, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले. संशयित आरोपी अक्षय शिंदे याला ऑगस्टमध्ये अटक केल्यानंतर 24 सप्टेंबर रोजी पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासातील त्रुटी आणि आरोपीच्या मृत्यूची चौकशी करणार्या दंडाधिकार्यांनी सादर केलेली कागदपत्रे तपासल्यानंतर उच्च न्यायालयने तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी 20 जानेवारी 2025 रोजी निश्चित करण्यात आली आहे.