भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. काल मुसळधार पावसामुळे खेळ रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आज टीम इंडियाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा संघ क्रिकेट विश्वातील एक मजबूत संघ आहे. आज भारताच्या संघावर पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंड संघाचा दबदबा पाहायला मिळाला.
नवी दिल्ली : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. काल मुसळधार पावसामुळे खेळ रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आज टीम इंडियाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा संघ क्रिकेट विश्वातील एक मजबूत संघ आहे. आज भारताच्या संघावर पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंड संघाचा दबदबा पाहायला मिळाला. रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल या दोन खेळाडूंना सोडून भारताच्या एकही खेळाडूने दुहेरी आकडा पार केला नाही. भारताचे पाच फलंदाज शून्यावर आउट झाले आहेत. तर रोहित शर्माने २ धावा, जसप्रीत बुमराह १ धाव करून बाद झाले आहेत.
भारताच्या संघाने बांग्लादेशविरुद्ध कमालीची कामगिरी केली, परंतु भारताचा संघ न्यूझीलंड सारख्या बलाढ्य संघासमोर डगमगला आणि पहिल्या इनिंगमध्ये फार मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. न्यूझीलंडच्या संघाने भारताच्या संघाला ४६ धावांवर सर्वबाद केले आहे.
भारतीय गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर वेगवान गोलंदाजांमध्ये भारताच्या संघाकडे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचे पर्याय आहेत. तर भारताच्या संघाकडे फिरकी गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचे पर्याय उपलब्ध आहेत. बांग्लादेशविरुद्ध सामन्यामध्ये अर्शदीपला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या T२० मालिकेमध्ये अर्शदीप सिंह खेळल्यामुळे त्याला आता काही वेळ विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागेवर कुलदीप यादवला प्लेइंग ११ मध्ये संधी देण्यात आली आहे.
आज पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये पुन्हा शुभमन गिल आणि अर्षदिप या खेळाडूंचे संघामध्ये पुनरागमन होणार का? असा चाहत्यांचा प्रश्न आहे. भारताच्या आजच्या निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियाने पहिल्या इनिंग संधी गमावली आहे.
भारतीय संघाची पहिल्या सामान्यत प्लेइंग ११
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड संघाची पहिल्या सामन्यात प्लेइंग ११
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साऊदी, एजाझ पटेल, विल्यम ओ’रुर्के.