पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने त्याची झलक दाखवून दिली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याच्यावर टाकलेला विश्वास कामी आला. वॉशिंग्टन सुंदरने सेट झालेला रचिन रवींद्रला बाद करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर डॅरि मिचेलला त्याने पायचित करीत पॅव्हेलिनमध्ये पाठवले.
पुणे : पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने त्याची झलक दाखवून दिली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याच्यावर टाकलेला विश्वास कामी आला. वॉशिंग्टन सुंदरने सेट झालेला रचिन रवींद्रला बाद करीत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर डॅरि मिचेलला त्याने पायचित करीत पॅव्हेलिनमध्ये पाठवले. त्यानंतर टाॅम ब्लन्डेलला क्लिन बोल्ड करीत न्यूझईलंड संघाला मोठा धक्का दिला. वॉशिंग्टन सुंदरने आज किवींचे कंबरडेच मोडले, 6 विकेट घेत न्यूझीलंडची खेळी संपवली.
वॉशिंग्टन सुंदर हा दर्जेदार गोलंदाज
कालच गौतम गंभीर याने पत्रकार परिषदेत वॉशिंग्टन सुंदरचे गोडवे गायले होते. यामध्ये त्याने वॉशिंग्टन सुंदरवर अधिक भर देत त्याला निश्चितपणे खेळवले जाईल, असा विश्वास व्यक्त केला होता. आज त्याचा हा विश्वास वॉशिंग्टन सुंदरने सार्थ केला. भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात टीम इंडियाने आपली रणनीती राखून ठेवली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. वॉशिंग्टन सुंदर हा संघाचा भाग असणार, तरीही उद्याच सर्व अंदाज घेऊन ठरवणार प्लेईंग इलेव्हन तसेच आम्ही उद्या पिच आणि नाणेफेक आमच्यासाठी महत्त्वाची राहणार आहे. हे सर्व पाहूनच खेळाडूंची यादी ठरवू, शुभमन गिल आणि वाॅशिंग्टन संदर निश्चितच संघाचे भाग राहतील परंतु पिच आणि इतर सर्व बाजू पाहूनच आम्ही निर्णय घेणार असल्याचे गौतम गंभीर यांने सांगतिले. यांमध्ये निश्चितच केएल राहुलचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
पुणे टेस्ट जिंकण्याच्या उद्देशाने प्लेईंग इलेव्हन
उद्या आम्ही पिचचा अंदाज घेऊन खेळाडू ठरवणार आहोत. तरी आपल्या येथे टॅलेंट एवढे आहे की, कोणता खेळाडू ठेवायचा कोणता काढायचा हा मोठा प्रश्न आमच्यासमोर असतो. तरी आम्ही यावर निश्चितच उपाय काढून विजयासाठी आवश्यक तयारी करू. असे नाही की हा फक्त पुण्यात प्रश्न येतो असा प्रश्न अनेक ठिकाणी येतो त्याचे कारण म्हणजे भारतात टॅलेंट खूप आहे.
आपल्याकडे भरपूूनर टॅलेंट
इंडियाची प्लेईंग इलेव्हन निवडणे फक्त पुण्यात निवडणे अवघड आहे असे नाही तर कुठेही निवडणे अवघड आहे. शुभमन गिलने अजूनही प्लेईंग इलेव्हनमध्ये घेतलेले नाही. मागच्या सामन्यात त्याच्या मानेच्या दुखण्यामुळे बाहेर ठेवले होते. इन्जरीमुळे ते बाहेर होते. तरी आम्ही ही टेस्ट जिंकण्याच्या उद्देशाने प्लेईंग इलेव्हन तयार करणार आहोत. त्यामुळे आता आम्ही बोलणार नाही.