सीआरपीएफच्या (CRPF) दिल्लीसह देशभरातील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्व सीआरपीएफ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे. सोमवारी रात्री देशातील अनेक शाळांना हा मेल आला होता.
सविस्तर वृत्तनागठाणे, ता. सातारा येथील पुणे-बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम दोन महिन्यांपासून बंद आहे. ठेकेदार कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे हे काम ठप्प झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. काम ठप्प झाल्याने नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. केवळ पुलाचे काम न झाल्याने 60 गावांमधील लोकांचा जीव टांगणीला लागला आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पुढील महिन्यात घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यात भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या यादीत नाव नसलेल्या आणि दुसऱ्या यादीसाठी वेटींगवर ठेवण्यात आलेल्या 16 विद्यमान आमदारांची धाकधूक आता वाढली आहे.
सविस्तर वृत्तराज्यात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू असतानाच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील तीन लोकसभा आणि पाच विधानसभा मतदारसंघाची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची नावे बदलण्यात येणार आहेत.
सविस्तर वृत्तनांदेड आणि हिंगोली भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. हिंगोली आणि नांदेडमध्ये आज सकाळीच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. साखर झोपेत असताना भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील २ गावांना भूकंपाचे धक्के बसले.
सविस्तर वृत्तभाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व घटकपक्षांच्या महायुतीचे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता शेंद्रे येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे हा मेळावा होणार आहे, अशी माहिती सातारा लोकसभा समन्वयक सुनील काटकर यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तनिवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणार्या फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकांच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांना मतदान करणं शक्य व्हावं, यासाठी मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने निवडणुकीच्या काळातील नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरला ठेवण्यात आलेल्या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमहाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विदर्भातील जागांवरुन मतभेद होते. विदर्भातील काही जागांवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा केला जात होता.
सविस्तर वृत्तसूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता आला. सूरज चव्हाण विजेता झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. सूरज चव्हाणने त्याचा साधेपणा, खरा स्वभाव आणि टास्कमध्ये दिलेलं १०० टक्के योगदान यामुळे त्याने बिग बॉसच्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. सूरजला बिग बॉसमध्ये सहभागी करुन घेण्यास कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदेंचंही मोठं योगदान आहे.
सविस्तर वृत्त