मलकापुरात भला मोठा कंटेनर खड्ड्यात अडकल्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग एक तास ठप्प झाला. नांदलापूर हद्दीत भराव पुलाशेजारी रविवारी दुपारी ही घटना घडली. यामुळे खड्डे बुजवण्यात होणारा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सविस्तर वृत्तयेथील सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांची कन्या, राष्ट्रीय नेमबाज, रिनाऊंड शूटर शरयू संजय मोरे (वय २२) हिचा बारामती येथे मोपेड दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तवाई, पाचगणी व महाबळेश्वर येथील पर्यटनवाढीच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या सुरूर ते कुंभरोशी या महामार्गाच्या कामाची गती वाढवा अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याच्या पर्यटनाचा मुकुटमणी असलेल्या कास पठाराच्या यावर्षीच्या हंगामाची सुरुवात गुरुवारपासून करण्यात येणार आहे. याबाबतचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपल्या कार्यालयात नुकताच घेतला.
सविस्तर वृत्तकराड उत्तरमध्ये भटक्या विमुक्त जमातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, हा समाज आजही मागासलेले जीवन जगत आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जास्तीत जास्त काम करणार आहे.
सविस्तर वृत्तनीरा (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे दुचाकींवर भगवे झेंडे लावून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषणा देत आलेल्या १० ते १५ जणांनी आपणास दमदाटी, शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
सविस्तर वृत्तमराठा आरक्षणाबाबत विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे. मराठा व ओबीसी समाजाबद्दलची भूमिका त्यांनी अगोदर स्पष्ट करावी. शरद पवार हे ज्येष्ठ व परिपक्व नेते आहेत.
सविस्तर वृत्तआजच्या डिजिटल युगात सायबर सिक्युरिटी व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) हे क्षेत्र सर्वाधिक वेगाने विकसित होत असून, विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून स्वतःचा विकास साधावा.
सविस्तर वृत्तआमचे शंभर टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय महू धरणातील पाण्याचा एक थेंबही खाली सोडू देणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर खालचे आणि वरचे असा वाद निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजणार्या ‘त्या’ नेत्यांच्या जलसमाधी आंदोलनात आमचा एकही प्रकल्पग्रस्त सहभागी होणार नाही.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात एकूण 41 आश्रम शाळा आहेत. या शाळेतील एकही विद्यार्थी गोवर आजाराच्या संरक्षणासाठी देण्यात येणाऱ्या लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.
सविस्तर वृत्त