सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मंगळवार आचारसंहिता लागू झाली. जिल्ह्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्या संदर्भाने सातारा जिल्ह्यात 3165 मतदान केंद्रे असून जिल्ह्यातील 24 लाख 28 हजार 871 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये सातारा जिल्ह्यातील दोन शाळेचा गौरव झाला आहे. शासकीय शाळांच्या गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी (ता. सातारा) या शाळेचा कोल्हापूर विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ज्ञानसंवर्धिनी विद्यालय शिरवळ (ता. खंडाळा) या शाळेला कोल्हापूर विभागांमध्ये तृतीय क्रमांक मिळाला.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय पोषण माह उपक्रमात महाराष्ट्राने देशात पहिला नंबर पटकावला आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांनी या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या सातव्या राष्ट्रीय पोषण महा सांगता समारंभ झाला. या उपक्रमात राज्यात तृतीय क्रमांकावर कामगिरी केलेल्या सातारा जिल्हा परिषदेचाही सत्कार करण्यात आला.
सविस्तर वृत्तज्यांच्याकडे सांगण्यासाठी काही नसते, त्यांना काही ना काही कृप्त्या लढवाव्या लागतात. मी माझ्या मतदारसंघात एवढे काम केले आहे की मला विरोधकांबाबत बोलण्यासाठी वेळ नाही. लोकांच्या हिताचे आणि विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळेच मतदारसंघातील माझ्या बहिणी, नागरिक माझ्यावर प्रेम करीत आहेत. तसेच रामराजे कधीच कोणाचे नाहीत. शरद पवारांनी त्यांना नाव दिले, त्यांना त्यांनी सोडले.
सविस्तर वृत्तरोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प ट्रस्ट संचलित आनंदबन मतिमंद मुलांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामधील १८ वर्षांच्या पुढील प्रौढ विशेष मुलांनी बनवलेल्या "रोटरी दिवाळी कीट" चे उद्घाटन श्रेणीकभाई शाह- व्यवस्थापक- म्हसवडकर सराफ- सातारा यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. या कीटला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सविस्तर वृत्ततुम्ही काही चिंता करू नका. काही झालं तरी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात महाराष्ट्रात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फलटण येथे सांगितले.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेच्या बांधकाम विभागाचे ‘क’ श्रेणीतील अभियंता सुधीर चव्हाण व अनंत प्रभुणे यांची बदली करण्यात आली आहे. चव्हाण यांची बदली कराड नगरपालिकेत तर, प्रभुणे यांची बदली वाई नगरपालिकेत करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमारहाण तसेच विनयभंगप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तजावळी, महाबळेश्वर, सातारा आणि पाटण या चार तालुक्यांतील २३५ गावांचा समावेश असलेली नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला. पर्यटन वाढीसह समाविष्ट गावांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक पर्याय यात समाविष्ट केले आहेत. प्रकल्पाचे विशेष प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांची नियुक्ती असून, त्यांच्या वतीने हा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वरवाडी (ता. माण) येथे चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या. शिवतेज सचिन गाढवे (वय चार) असे त्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्त