ऊसाचा गळीत हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकर्यांचे कारखान्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. म्हणूनच शेतकर्यांच्या कष्टाची ऊसाची एकरकमी एफआरपी जमा करा. अन्यथा रयत क्रांती संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.
सविस्तर वृत्तलाडकी बहीण योजना ही योजना फसवी होती. आर्थिक टंचाईमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे आणि सत्ताधारी निवडणूक आयोगाने सांगितले म्हणून ही योजना बंद केल्याचे खोटे सांगत आहेत. ही वस्तुस्थिती जनतेला कळली पाहिजे, अशी कडवट टीका आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
सविस्तर वृत्तभारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीने 99 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये सातारा जिल्ह्यातून पहिल्या यादीत सातारा विधानसभा मतदारसंघासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले, माण विधानसभा मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे, तर कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांच्या नावाची निश्चिती झाली आहे
सविस्तर वृत्तभारत सरकारच्या, राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी त्यांच्या सातारा दौऱ्यामध्ये जनता सहकारी बँक लि., सातारास नुकतीच सदिच्छा भेट दिली. प्रभु यांनी बँकेची आर्थिक स्थिती, कामकाजाचा आढावा घेवून बँकेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमुद केले.
सविस्तर वृत्तजम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन होऊन अगदी दोन दिवस झाले आहेत. यामध्येच आता जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाई होण्यास सुरुवात झाली आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये परप्रांतीय मजुरांची हत्या करण्यात आली. बिहारमधील एका मजुराची दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली. या कामगाराचा मृतदेह झुडपातून बाहेर काढण्यात आला आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. बाजारपेठेत दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर साहित्य विक्रीस बसलेल्या छोट्या व्यावसायिकांसह व्यापार्यांची तारांबळ उडाली.
सविस्तर वृत्तअजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीत कामगार- कर्मचाऱ्यांचे नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त कारखान्याच्या कामगार- कर्मचाऱ्यांना १९ टक्के बोनस देण्यात येत असून यानिमित्ताने कामगार- कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सविस्तर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे, ता. महाबळेश्वर गावी एक दिवसाच्या दौर्याकरता आले होते. दरम्यान हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होत असताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पुन्हा दरे गावातील हेलिपॅड वर उतरवण्याची वेळ आली. मात्र तातडीच्या कामासाठी मुख्यमंत्री शिंदे मोटारीने मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वृत्तभाजपचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक एका कार्यक्रमासाठी सातारा येथे आले असताना त्यांनी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कार्यालयास भेट दिली.
सविस्तर वृत्तराज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर रूपाली चाकणकर यांनी न्यूज मीडियाला प्रतिक्रिया दिली. 2019 ला मी खडकवासला मतदारसंघाची मागणी केली होती.
सविस्तर वृत्त