येथे गेल्या आठ दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. थंडीत वाढ झाली आहे. येथील वेण्णालेक तलावातून वेण्णा नदी ओसंडून वाहत आहे.
सविस्तर वृत्तकोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर आज मंदावला. मात्र, दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याची आवक कमी झाली नसल्याने काल रात्रीपासून धरणाचे दरवाजे १३ फुटांवर स्थिर ठेवले आहेत.
सविस्तर वृत्तरायगड समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची घटना घडली होती. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली. दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याचे समजत आहे.
सविस्तर वृत्तएव्हरेस्ट बेस कॅम्प, आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किलीमांजारो... आता युरोप खंडातील सर्वात उंच शिखर माऊंट एलब्रुस सर करणाऱ्या साताऱ्याची 'अजिंक्यकन्या' धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिचे गुरुवारी (दि. २१) सायंकाळी सात वाजता साताऱ्यातील पोवई नाका येथील शिवतीर्थावर जंगी स्वागत केले जाणार आहेत.
सविस्तर वृत्तकापील तालुका कराड येथील बोगस मतदार यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. व यास जबाबदार असणार्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची चौकशी करावी या मागणीसाठी 14 ऑगस्ट पासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेले कापील ग्रामपंचायतचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्या बेमुदत उपोषणास राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या वतीने तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन देऊन गणेश पवार यांना पाठिंबा देण्यात आला.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर तालुका आपत्ती व्यवस्थ्ज्ञापन कक्ष कार्यरत ठेवा. येणाऱ्या प्रत्येक कॉलला सकारात्मक प्रतिसाद द्या. तसेच कॉलच्या नोंदी ठेवा, ज्या पुलांवर पाणी येते ते पूल वाहतूकीसाठी तातडीने बंद करा.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात सन 2025-2026 साठी पीककर्ज वितरणाचे 3800 कोटींचे उद्दिष्ट असून जुलै अखेर 2 लाख 49 हजार 186 खातेधारकांना खरिपासाठी 1812 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले.
सविस्तर वृत्तयेथील मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन आणि प्रभुणे क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुप्रसिध्द मनोविकार तज्ज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी यांचा प्रभावी पालकत्व या विषयावर संवाद आयोजित करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तकराड शहराच्या सुशोभिकरणासाठी उभारण्यात आलेली बंद असलेली कारंजी तात्काळ कार्यान्वित करावीत. अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल.
सविस्तर वृत्तकोयना धरणासह धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी,तारळी व वीर या प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त