विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या अनुषंगाने २६२- सातारा विधानसभा मतदार संघामधील आदर्श आचारसंहिता अंमलबजाणीसाठी निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तदुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीएस ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका 18 ऑक्टोंबर 2024 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक वाहन धारक या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरुन आरक्षित करु शकतील. दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तसरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले करण्यात आली होती. महंत रामगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात आली होती. यानंतर आता सोशल माध्यमावर एका विशिष्ट समाजाकडून पोस्ट व्हायरल करत संभाजीनगरमध्ये एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तडेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल सध्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरी करत आहे. याचाच एक भाग म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उमा प्रभू यांनी नुकतेच शालामाउलीला सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध संगीत मार्गदर्शक सुरेशराव साखवळकर, शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, शालेय समितीचे सदस्य अनंतराव जोशी, सारंग कोल्हापुरे, नितीन पोरे यांचे सह मान्यवरांची उपस्थिती होती.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच दशकांमध्ये शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते होते. मात्र त्यांनी मराठा आरक्षणासह पश्चिम महाराष्ट्राच्या सिंचन योजना लटकत ठेवल्या. त्यांनी स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी इतरांना वंचित ठेवण्याचे काम केले. गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात विकासाची जी फळे आहेत ती महायुती सरकारमुळे दिसत आहेत.
सविस्तर वृत्तपुणे-सोलापूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. पुणे सोलापूर मार्गावरील या अपघातामुळे वाहतूक विस्कळित झाली आहे.
सविस्तर वृत्तसध्या महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांचा समावेश आहे. असे असताना समीर वानखेडे यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. तर प्रशासकीय कामांना वेग आला आहे. निवडणुका जाहीर होताच आता पोलिसांचीही कामे वाढणार आहेत. मुंबईसह राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टीसह रजा बंद केल्या आहेत.
सविस्तर वृत्तसाताऱ्याच्या श्लोक विक्रम घोरपडे याने केटीएम फॅक्टरी रेसिंग इंडियाच्या टीमला मोठा विजय मिळवून दिला आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी मसापचे कोषाध्यक्ष विनोद सुर्यनारायण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत मराठी भाषा विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.
सविस्तर वृत्त