बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांची लढाई स्वतःचे डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल, तर अजितदादा यांची लढाई 2019 च्या मताधिक्याचा विक्रम मोडण्यासाठी असेल. असे म्हणत, राषट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शरद पवारगटाला डिवचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तडॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मतदारसंघात कोट्यावधींच्या निधीतून विकासकामे केली आहेत. जनतेनेही एक व्यक्ती म्हणून अतुलबाबांकडे बघून त्यांच्या कामाची पोहोचपावती मतदानातून द्यावी. कराड दक्षिणमध्ये परिवर्तन परिवर्तन करण्याची ही संधी असून या ठिकाणी डॉक्टर भोसले यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला खुलाश्यासह (disclaimer) चिन्हाचा वापर आणि ४ नोव्हेंबरपर्यंत नवीन हमीपत्र दाखल करण्यास सांगितले आहे की ते त्यांच्या निर्देशांचे उल्लंघन करणार नाहीत.
सविस्तर वृत्तबल्क एस.एम.एस. व्हॉईस एस.एम.एस.. इलेक्ट्रॉनिक मीडिया, टिव्ही, केबल चॅनल्स, रेडिओ, एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, ऑडिओ व्हिज्युअल यासह सोशल मिडीयावरून देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींना प्रसिद्धपूर्व प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच मतदन पूर्व दिवशी व मतदनाच्या दिवशी प्रिंट मीडियातून प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींनाही माध्यम व सनियंत्रण कक्षाकडून प्रामणीत करुन घेणे बंधनकारक आहे.
सविस्तर वृत्तदिवाळी सण काही दिवसांवर आल्याने खासगी, सरकारी सर्वच बँकांमध्ये मोठी गर्दी उसळली आहे. व्यापारी, नागरिक पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी बँकांमध्ये आले आहेत. दिवाळीला मोठा खर्च केला जातो. लोकांचा बोनस आणि पगारही बँकांमध्ये जमा झालेला आहे. यामुळे या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाणार आहे. अशातच बँका दिवाळी सुट्टीमुळे काही दिवस बंद असणार आहेत.
सविस्तर वृत्तराज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 20, नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीचे बहुतांश उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अजित पवार गट, शिंदे गट व भाजपची यादी जाहीर करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमाणच्या पश्चिमेकडील तेलदर्यासह अनेक गावात बुधवारी पहाटे दोन तास ढग फुटीसद़ृश पाऊस झाला. या पावसाचे पाणी आंधळी नदीपात्रात आल्याने माणगंगा नदीला पूर आला. दहिवडी परिसरात पावसाचा थेंबही न पडता बुधवारी दहिवडी-जुना फलटण रस्ता पाण्याखाली गेला. पाऊस न पडता चार ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. गेले काही दिवस हवेत उष्मा निर्माण होत आहे.
सविस्तर वृत्तवाई तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने त्याचा रब्बी हंगामातील पेरणीवर विपरीत परिणाम झालेला आहे. सध्या रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत. मात्र, परतीच्या पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा व इतर पिकांच्या पेरणी कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सद्यः स्थितीत तालुक्यात 50 टक्के पिकांचा पेरा झाला आहे.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक बडे नेते आपला अर्ज दाखल करत आहेत. हा अर्ज भरताना हे उमेदवार मोठे शक्तिप्रदर्शन करत आहेत. दरम्यान, एकीकडे अर्ज भरण्यााची लगबग चालू असताना दुसरीकडे हे नेते प्रचारासाठी खास रणनीती आखत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही यात मागे नाहीत. त्यांनी लाडकी बहीण योजनेचा आधार घेत महाराष्ट्रातील महिला मतदार तसेच पुरुष मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास शक्कल लढवली आहे.
सविस्तर वृत्तमहायुती सरकारने लोकहिताचे निर्णय वेळोवेळी घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. विरोधकांना बोलायला जागा नसल्यामुळे केवळ अफवा म्हणून वेगवेगळ्या योजनांवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून राज्याची चौफेर प्रगती सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनंतर लाडकी बहीण योजनेची ओवाळणी वाढवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.
सविस्तर वृत्त