मी गेली 15 वर्षे माण-खटावच्या स्वाभिमानी मातीची आणि मायबाप जनतेची ईमानेइतबारे सेवा केली आहे. दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे. जनतेचे आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी राहिले असल्याने माझा अर्ज भरला त्याच दिवशी मी निवडणूक जिंकली आहे.
एकाच आधार कार्डवर लाडकी बहीणचे ३० अर्ज खारघरचे आधारकार्ड नंबर भरले. साताऱ्यात या मथळ्याखाली दैनिक लोकमत, सातारा दि.०३/०९/२०२४ रोजी बातमी प्रसिध्द झालेली आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने तपासणी केली असता "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" ladakibahin.maharashtra.gov.in या नवीन पोर्टलवर प्रतीक्षा पोपट जाधव मु.पो.मायणी ता. खटाव जि. सातारा या २२ वर्ष वयोगटातील मुलीच्या नावाचे वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करुन अर्ज भरण्यात आलेले आहेत.