कालकथित वंदना बजरंग काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण

मौजे हिंगणगाव ता.फलटण जि.सातारा येथील कालकथित वंदना बजरंग काकडे यांचे निधन झाले.आज त्यांचे अस्थि विसर्जन व पुण्यानुमोदन कार्यक्रम होता. दिनांक 29/08/2025 रोजी अस्थि संकलन करुन प्रवाही पाण्यात विसर्जन केले जाणार होते.
फलटण : मौजे हिंगणगाव ता.फलटण जि.सातारा येथील कालकथित वंदना बजरंग काकडे यांचे निधन झाले.आज त्यांचे अस्थि विसर्जन व पुण्यानुमोदन कार्यक्रम होता. दिनांक 29/08/2025 रोजी अस्थि संकलन करुन प्रवाही पाण्यात विसर्जन केले जाणार होते. पण या पारंपारिक प्रथेला फाटा देऊन भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांच्या बौद्ध धम्मातील विज्ञानवादी दृष्टिकोन व पर्यावरण संवर्धन व रक्षणाचा विचार ऐकून अस्थि विसर्जन प्रवाही पाण्यामध्ये न करता कालकथित वंदना बजरंग काकडे यांच्या अस्थी त्यांच्याच रानात मिसळून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ बोधिवृक्ष पिंपळ व आंब्याचे झाड लावून त्यांच्या स्मृती कायम स्वरूपी जपण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. यावेळी उपस्थित असणारे हिंगणगाव मधील ग्रामस्थ, बौद्ध उपासक-उपासिका व या अस्थि विसर्जन व पुण्यानुमोदन विधीसाठी आलेले नातेवाईक व आप्तेष्ठ यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्म विचारांच्या माध्यमातून विज्ञानवादी दृष्टिकोन व पर्यावरण रक्षणाविषयी धम्म उपदेश केला.त्यांनी जग हे अनित्य असून आपल्या कुटुंबातील जिवलग व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या स्मृती म्हणून वृक्षारोपण करून येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवण्याचा विचार मांडला. त्यांच्या या विचाराला पाठिंबा देत सर्व कुटुंबीयांनी हा निर्णय घेऊन पर्यावरण रक्षणाचा व संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी धीरज बजरंग काकडे, सूरज भीमराव काकडे, सागर जगदीश बागडे, ताराचंद बापूराव काकडे, अभिजीत प्रकाश कांबळे, गणेश संतोष जगताप, ॲड.सरेंद्र सरतापे, विशाल राजेश काकडे, सुरज भीमराव काकडे हे वृक्षारोपण करते वेळी उपस्थित होते.