गणेशोत्सवानिमित्त सातारा शहरातील वाहतुकीत बदल

श्री गणेश उत्सव २०२५ निमीत्त सातारा शहरात लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तसेच, वाहतूकीची कोंडी अनुचित प्रकार होऊन सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.
सातारा : श्री गणेश उत्सव २०२५ निमीत्त सातारा शहरात लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तसेच, वाहतूकीची कोंडी अनुचित प्रकार होऊन सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी दि.२६/०८/२०२५ चे १०:०० वा. पासून ते ७/०९/२०२५ चे रात्री. १०.०० पर्यंत सातारा शहरातील अंतर्गत वाहतुक व्यवस्थापनात खालीलप्रमाणे बदल करणेत येत आहे.
१) सातारा शहरात ज्या दिशेस गणपती मंडळे आहेत, त्याच दिशेस दिनांक २६/०८/२०२५ ते दिनांक ०६/०९/२०२५ पर्यंत वाहन पार्किंगची सोय करावी.
२) सातारा शहरात येणारी अवजड वाहने ही सकाळी ०६.०० वा ते १०.०० वा पर्यंतच येतील. अन्य वेळेत येणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
३) राजपथ रोड, शाहु चौक ते समर्थ मंदिर रोड, मोती चौक ते पोवई नाका रस्त्यालगत असणारी बेवारस वाहने रहिवासी यांची वाहने दिनांक २६/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ पर्यंत पर्यायी पार्किंगमध्ये लावावीत.
४) सातारा शहरात खरेदीसाठी चारचाकी वाहन घेवुन येणाऱ्या नागरीकांनी आपले वाहन तालीम संघ तसेच राजवाडा येथील आळूचा खड्डा वाहनतळ येथे आपली वाहने पार्किंग करावी.
तरी या बदलाची सर्व नागरीकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे.